Logo
ताज्या बातम्या

मंदीचे मळभ दूर! नव्या वर्षात नोकरीच्या संधी ८.३ टक्के वाढणार; रिपोर्ट

यंदाचे २०२४ नववर्ष हे नवीन नोकरीच्या संधी घेऊन येत आहे. दरम्यान या वर्षात जवळपास नोकरभरतीच्या क्षमतेत ८.३ वाढ अपेक्षित असल्याचे एका अहवालात म्हटले आहे. यामध्ये सर्वाधिक वाढ ही बंगळूरमध्ये होणार असल्याचे देखील या अहवालात म्हटले आहे, असे वृत्त ‘द इकॉनॉमिक टाईम्स’ने दिले आहे. डिसेंबरमध्ये नोकरीच्या बाजारपेठेत सुधारणा होण्याची चिन्हे दिसू लागल्याने यावर्षी एकूण भरतीत ८.३ टक्के वाढ अपेक्षित आहे, असे गुरुवारी (दि.४) एका अहवालात म्हटले आहे. डिसेंबरमध्ये नोकरभरतीत २ टक्के वाढ झाली आहे, असे फाउंडिटच्या वार्षिक ट्रेंड अहवालात म्हटले आहे. यंदाच्या नववर्षात एकूण नोकरसंधी काही प्रमाणात वाढणार आहे. यामध्ये क्षेत्रांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, BFSI, ऑटोमोटिव्ह, रिटेल आणि प्रवास आणि पर्यटन यांचा समावेश आहे. फाउंडिट इनसाइट्स ट्रॅकरच्या (फिट) आकडेवारीनुसार, 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये नोकरभरतीची संधी ५ टक्क्यांनी कमी झाली होती, त्यामुळे २०२३ मध्ये नोकरीच्या बाजारपेठेत मंदीचे संकेत देण्यात आले होते. मात्र डिसेंबरमध्ये यामध्ये सुधारणा होऊन, २ टक्के वाढ झाली होती.