Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : शुद्धपेयजल प्रकल्प कार्यन्वित करा

शहरातील ९९ शुद्ध पेयजल प्रकल्प तत्काळ सुरू व्हावेत, या मागणीचे निवेदन इचलकरंजी नागरिक मंचतर्फे महापालिका उपायुक्त सोमनाथ आढाव यांना दिले. आठ दिवसांत प्रकल्प सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. दरम्यान, उपायुक्त आढाव यांनी प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागास दिले. इचलकरंजी शहरात तत्कालीन नगरपालिकेच्या ठरावानुसार व आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नांतून साडेतीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने ९९ शुद्ध पेयजल प्रकल्पांस मंजुरी दिली होती.