इचलकरंजी येथील ऑन ड्युटी मृत होमगार्डच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत. इचलकरंजी येथील होमगार्ड पथकातील विष्णू भोळे हे मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी बंदोबस्त साठी गेले असताना त्यांचे त्या ठिकाणी हृदयविकाराने निधन झाले. या निधनामुळे त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना या घटनेचा सर्वांना धक्का बसला होता. त्यावेळी सिंधुदुर्ग पोलीस तसेच कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पुढाकार घेऊन त्यांना योग्य ती मदत करून श्री भोळे यांच्यावर इचलकरंजी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. श्री भोळे यांची परिस्थिती हालाकिची असल्याचे समजल्याने सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस दलाने आर्थिक अशी भरीव निधी भोळे यांच्या कुटुंबीयांना दिली आहे. तसेच पंतप्रधान व्हीआयपी व्हाट्सअप ग्रुपच्या मार्फत जमा केलेली रक्कम एक लाख 18 हजार रुपये भोळे यांची पत्नी व मुलगा यांच्याकडे अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड समादेशक अधिकारी सौ जयश्री देसाई यांच्या हस्ते देण्यात आली आहे. यावेळी शिवाजीनगर पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, शहापूर पोलीस निरीक्षक श्री भुजबळ, होमगार्ड जिल्हा कार्यालयाचे दिलीप हजारे, वरिष्ठ लिपिक काशीद, हातकणंगले तालुका पथकाचे समादेशक अधिकारी पापालाल संधी, इचलकरंजी उपपथकाचे अधिकारी संजय वडईंगए, प्रमोद कांबळे, प्रकाश कोरवी, यशवंत पवार, संजय देसाई, गजानन भोसले आदिंसह होमगार्ड उपस्थित होते.