Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : नूतन वर्षीय नवउद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी पर्वणी ठरेल; भाजप सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष विजय कोळेकर

नूतन वर्ष हे नवउद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी नक्कीच पर्वणी ठरेल विजय कोळेकर. केंद्र सरकारच्या प्रोत्सानातून आणि भरघोस सबसिडी व मदतीमुळे मिळत असलेल्या विविध योजनांमधून 2024 साल हे लघु मध्यम उद्योजकांसाठी व्यवसाय वाढीसाठी नक्कीच आशादायक ठरेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय कोळेकर यांनी केले. आम्ही उद्योजक या ग्रुपने आयोजित केलेल्या उद्योजक मेळावा व आम्ही उद्योजक दिनदर्शिका 2024 प्रकाशन या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे संदीप कल्याणकर यांनी आपल्या मनोगतात तब्बल 4000 उद्योजक एकत्र आणणारे आम्ही उद्योजक या सर्व उद्योजकांचे एकत्रित डिजिटल ॲप बनवून त्यांचे मार्केटिंग आणखी सुलभ करावे, अशी सूचना केली. आम्ही उद्योजकचे एडमिन पत्रकार इराणा सिंहासनी यांनी स्वागत केले.तर ग्रुपचे संस्थापक राजू नदाफ यांनी प्रास्ताविक केले. तर गणेश भांबे मयूर शहा, वसंत सपकाळे, माजी नगरसेविका ध्रुवती दळवा यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सौ मनाली शहा व प्रमोद इदाते यांनी केले‌. तर आभार मुकुंद तारळेकर यांनी केले‌. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश लाड सौ.शैला गायकवाड, अरुण म्हेत्रे, युवराज मगदूम, रमेश धोत्रे ,संजय काशीद यांनी परिश्रम घेतले‌.