Logo
ताज्या बातम्या

नोकरीची संधी ! एआय इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड ‘असिस्टंट सुपरवायझर’ पदांची भरती: ऑनलाइन अर्ज

एआय इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) (एआय असेट्स होल्डींग लिमिटेड कंपनीची संपूर्ण मालकीची उपकंपनी) (Ref. No. AIESL/ HR- HQ/२०२३/३९७५ ३ि. २२.१२.२०२३). AIESL च्या इंजिनीअरिंग अ‍ॅक्टिव्हीटी सेंटर्समध्ये ‘असिस्टंट सुपरवायझर’ पदांची ठरावीक मुदतीकरिता भरती. (FTE) (सुरुवातीला ५ वर्षांसाठी) त्यानंतर उमेदवाराची कामगिरी आणि कंपनीची गरज पाहून उमेदवारांना कराराची मुदतवाढ दिली जाईल. असिस्टंट सुपरवायझर एकूण रिक्त पदे – २०९ (मुंबई – ७०, दिल्ली – ८७, नागपूर, १०, हैदराबाद – १०, कोलकता – १२, तिरुअनंतपुरम – २०). अजा/ अज/ इमाव/ माजी सैनिक यांना गव्हर्न्मेंटच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आरक्षण दिले जाईल. पात्रता : (दि. १ जानेवारी २०२४ रोजी) बी.एस्सी./ बी.ए./ बी.कॉम. किंवा समतूल्य पदवी आणि १ वर्ष कालावधीचा कॉम्प्युटर सर्टिफिकेट कोर्स आणि डेटा एन्ट्री/ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्सवरील कामाचा १ वर्षाचा अनुभव. किंवा बी.सी.ए./ बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) आणि डेटा एन्ट्री/कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्सवरील कामाचा १ वर्षाचा अनुभव. वयोमर्यादा : (दि. १ जानेवारी २०२४ रोजी) खुला प्रवर्ग – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे. वेतन : दरमहा रु. २७,०००/- एकत्रित वेतन. निवड पद्धती : लेखी परीक्षा/ स्किल टेस्टसाठी पात्र उमेदवारांची यादी अकएरछ वेबसाईट www. aiesl. in वर प्रसिद्ध केली जाईल. लेखी परीक्षेनंतर उमेदवारांना MS- Word, MS- Excel & MS- PowerPoint इ. वरील स्किल टेस्ट द्यावी लागेल. लेखी परीक्षा/ स्किल टेस्टमधील शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची प्री-एम्प्लॉयमेंट मेडिकल टेस्ट कंपनीचा मेडिकल ऑफिसर घेईल. अर्जाचा नमुना www. aiesl. in या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. पूर्ण भरलेला विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह careers@aiesl. in या ई-मेल आयडीवर स्कॅन करून दि. १५ जानेवारी २०२४ पर्यंत अपलोड करून मेल करावा. शिवाय उमेदवारांनी त्यांची माहिती अकएरछ वेबसाईटवरील जाहिरातीमध्ये दिलेल्या Google Forms लिंकमधून सबमिट करावी. अर्जाचे शुल्क व इंटिमेशन चार्जेस : खुला/ ईडब्ल्यूएस/ इमाव – रु. १,०००/- हे RTGS/ NEFT द्वारे भरावयाचे आहे. AI Englineering Services Limited Bank Name : STATE BANK OF INDIA ; A/ c No. : 41102631800 IFSC : SBIN0000691 Branch – New Delhi Main Branch New Delhi -110001.