Logo
ताज्या बातम्या

भारतीय कुस्ती महासंघासाठी समितीची स्थापना; IOAचा निर्णय

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशने (IOA) आज (दि. २७) भारतीय कुस्ती महासंघाच्‍या (WFI) कारभारावर लक्ष ठेवण्‍यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन केली. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशने दिलेल्या माहितीनुसार, तीन सदस्‍यीय समितीमध्ये भूपेंद्र सिंग बाजवा यांची अध्यक्षपदी तर एमएम सोमय्या आणि मंजुषा कंवर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. WFI च्या नवीन संघटनेच्या निलंबनानंतर क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतीय ऑलिम्पिक संघटनेने ही समिती तयार केली आहे. ही समिती WFI च्या विविध कार्ये आणि उपक्रमांवर देखरेख करेल. यामध्ये खेळाडूंची निवड, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंची नावे पाठवणे, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, पर्यवेक्षण आणि बँक खाती व्यवस्थापित करणे आदी कामांचा समावेश आहे. 2023 च्या सुरुवातीपासूनच WFI मध्ये गोंधळ सुरू आहे. अनेक नामवंत कुस्तीपटूंनी तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात निषेध व्यक्त केल्यानंतर परिस्थिती चिघळली. यावरून राजकारण तापल्यानंतर केंद्र सरकारने तडकाफडकी कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. क्रीडा मंत्रालयाने रविवारी (दि. 24) याबाबतची घोषणा केली हाेती.