राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्याचा निर्णय नागपूर हिवाळी अधिवेशनात घेण्यात आला आहे. मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत आमदार प्रकाश आवाडे यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यभरातील वस्रोद्योग विशेषतः यंत्रमाग व्यवसाय मागील काही वर्षांपासून सतत अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. वेळोवेळी राज्य शासनाकडून निर्णयही घोषित करण्यात आले; पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही.