इचलकरंजी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी मयूर चिंदे यांची तर उपाध्यक्षपदी अरुण काशीद यांची निवड करण्यात आली. तसेच सचिवपदी राजेंद्र होळकर यांची तर खजिनदारपदी शैलेंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली. इचलकरंजी प्रेस क्लबच्या नूतन कार्यकारिणी निवडीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत सदर निवडी एकमताने करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष शरद सुखटणकर होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे, संजय खूळ, अजय काकडे, सुनिल मनोळे, संजय कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विषयांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली.