Logo
ताज्या बातम्या

देशाने केलीय 'अबकी बार 400 पार' ची घोषणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा २०२४ निवडणुकीच्या काही वेळाने दिल्लीमध्‍ये जाहीर केल्या जातील. तथापि, देशातील जनतेने निवडणुकीच्या तारखा अधिकृतपणे जाहीर होण्यापूर्वीच निकाल जाहीर केले आहेत. देशाने ‘अबकी बार 400 पार’ ची घोषणा केली आहे, नागरकुर्नूल येथील जाहीर सभेला झालेली गर्दी त्याची साक्ष आहे, असे प्रतिपासद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तेलंगणातील नगरकुर्नूल येथील जाहीर सभेत ते बोलत होते. आम्‍ही २५ कोटी जनतेला गरिबीतून बाहेर काढले एकेकाळी काँग्रेसने गरीबी हटाओचा नारा दिला. मात्र यामुळे गरिबांच्‍या जीनवता काही बदल झाला का, असा सवाल करत मागील दहा वर्षांमध्‍ये आम्‍ही देशातील २५ कोटीहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे.गेली २३ वर्ष मी मुख्‍यमंत्री म्‍हणून आणि आता पंतप्रधान म्‍हणून मी काम करत आहे. या काळात मला जनेतची सेवा करण्‍यची संधी मिळाली. या २३ वर्षांच्‍या काळात मी स्‍वत:साठी एकही दिवस जगला नाही. मी केवळ जनतेसाठी जगलो. माझ्‍या १४० कोटी कुटुंबातील सदस्‍यांसाठी मी दिवसरात्र काम केले. मोदींची हमी म्‍हणजे दिलेल्‍या हमी पूर्ण करण्‍याची हमी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. काँग्रेस आणि भारत राष्‍ट समिती पक्षांनी तेलंगणाची सर्व स्वप्ने धुळीस मिळवली आहेत. आधी ती भारत राष्‍ट्र समिती ‘महालूट’ होती आणि आता काँग्रेसची ‘बुरी नजर’ आहे. काँग्रेससाठी, तेलंगणाचा नाश करण्यासाठी 5 वर्षेही पुरेशी आहेत, असा टोलाही त्‍यांनी लगावला.