इचलकरंजीत विविध मागण्यांसाठी दिव्यांग संस्थेचे बे मुदत उपोषण. इचलकरंजी येथील दिव्यांग कल्याण सेवा संस्था यांच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांना पेन्शनसाठी स्वतंत्र पुणे दिव्यांग आयुक्त कार्यालय करण्यात यावे, प्रत्येक दिव्यांगाला मासिक पेन्शन रुपये 15000 किमान वेतन देऊन त्यावर इंडेक्स बसवुन त्यावर प्रत्येक वर्षी सहामाही रुपये 500 किंवा त्यापेक्षा जास्त वाढ करावे, पेन्शन वर किमान वेतन सारखा कायदा लागू करावा, महागाई भत्ता, भविष्य निर्वाह भत्ता, घरभाडे व प्रायव्हेट फंड देण्यात यावे. 60% च्या पुढे दिव्यांग असल्यास त्यांना मासिक पेन्शन रुपये 15000 व त्यांचे पालनपोषण करणाऱ्याला मासिक 7000 मानधन देण्यात यावे. प्रत्येक वर्षी दिवाळीसाठी खास स्वखुशीने म्हणून दहा हजार रुपये देण्यात यावे. तसेच सर्व दिव्यांगाना पेन्शनचे कायमस्वरूपी सर्टिफिकेट व कायमस्वरूपी स्मार्ट कार्ड देण्यात यावे.जिल्हा व्हाईस कार्यालय, तालुका व्हाईस कार्यालय नॉडल उच्च ऑफिसर, मोठे शहरासाठी कार्यालय व नोडल ऑफिसर ही अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच जिल्हा व तालुका व्हाईस समिती नेमण्यात यावी व सरकारी वकील यांची नेमणूक करण्यात यावी. अशा मागण्यांसह सर्व दिव्यांगाच्या किमान वेतन पंधरा हजार रुपये पेन्शन मासिकचे मुंबई मंत्रालयातील आदेश पत्र येऊपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरूच राहणार असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले आहे. यावेळी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.