सुळकुड पाणी योजनेसंदर्भात इचलकरंजी जनतेच्या भावना तीव्र आहेत. या संदर्भात शासन पातळीवर तातडीने बैठक लावून मार्ग काढावा, असे पत्र खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवारी दिले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांना बैठक लावण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारच्या अमृत २ योजनेतून इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. त्यासाठी आपण निधीही दिला आहे. पण काही लोकांच्या विरोधा मुळे काम सुरू झाले नाही.