इचलकरंजी कोल्हापूर रस्त्यावरील कबनूर ओड्याजवळुन गेलेल्या बायपास रस्त्यालगतचा सुमारे बारा एकर ऊस आगीमध्ये भस्मसात झाला आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कबनुर ओढ्यानजीक रात्री पंचगंगा साखर कारखान्याला जाणारा रस्त्याजवळील उसाच्या फडास आग लागली. बघता बघता आगेने रौद्र रूप धारण केले. पंचगंगा साखर कारखाना अग्निशमन गाडीने आग आटोक्यात आणली. परिसरातील शेतकऱ्यांनी मदत केली.दोन तासांनी आग आटोक्यात आली.या आगीत सुभाष कोले, जयकुमार कोले,या शेतकऱ्यांची सुमारे बारा एकर शेतातील ऊस भस्मसात झाला आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली असून सदर आगीचे रौद्र रूप पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. तसेच परिसरातील नागरिकांनी सदर आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले.