Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : व्हिजन इचलकरंजी या संस्थेतर्फे आजपासून माणुसकीची भिंत उपक्रम

व्हिजन इचलकरंजी या संस्थेतर्फे शुक्रवार ३ ते रविवार ५ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत येथील व्यंकटराव हायस्कूलसमोर 'माणुसकीची भिंत' उभी राहणार आहे. या ठिकाणी नागरिकांनी वापरण्यायोग्य नवे-जुने कपडे माणुसकीच्या भिंतीवर देऊन गरिबांची दिवाळी आनंदी करण्यासाठी मदतीचा हात द्यावा, तसेच ज्यांना कपडे हवे आहेत, त्यांनी घेऊन जावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.