Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :वस्त्रनगरीला पाण्याची तीव्र टंचाई

वस्त्रनगरीला पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. तसेच जागोजागी गळती लागल्याने देखील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील 43 हजार नळ जोडण्यांना मीटर बसवण्यासाठी 58 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. परंतु अजूनही मंजुरी मिळालेली नाही. जर या प्रस्तावास मंजुरी झाली तर नळांना मीटर बसवण्याचा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे शहरांमध्ये जे पाणी वाया जाणारे आहे ते किमान 30 टक्के पाणी वाचणार आहे.