Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : प्रलंबित विकास कामांचा पाठपुरावा करा :महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे

शासन पातळीवर प्रलंबित असणाऱ्या विविध विकासकामांचा पाठपुरावा करा, अशा सूचना महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिल्या. सध्या शासकीय योजनांतून सुरु असलेली विविध विकासकामे गुणवत्तापूर्वक होण्यासाठी दक्षता घ्यावी, असेही त्यांनी बजावले. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त दिवटे यांनी आज विभागप्रमुखांची बैठक घेतली. उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, तैमूर मुलाणी, सोमनाथ आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.