Logo
ताज्या बातम्या

सरकारी खात्यात ३०३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

सरकारी खात्यांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणाईसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ३०३ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.या संदर्भातली माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. नुकतीच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्तची पूर्व परीक्षा पार पडली. ही परीक्षा पार पडल्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध १६ संवर्गाच्या मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. चला तर मग जाणून घेऊयात अर्ज करण्याची प्रक्रिया आणि इतर महत्वाचे अपडेट्स.एकूण रिक्त जागांची संख्या ३०३ सहाय्यक राज्यकर आयुक्त, उपजिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपमुख्य कार्यकारी/ गट विकास अधिकारी, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ ४१, सहाय्यक गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांसारख्या अनेक जागांसाठी पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ? या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २१ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. त्यामुळे, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला https://mpsc.gov.in या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यासोबतच, या परीक्षे संदर्भातली अधिकची माहिती तुम्हाला या वेबसाईटवरून मिळू शकेल.अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ? सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट ब : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी मिळवलेली असावी. उद्योग अधिकारी (तांत्रिक) : या पदासाठी उमेदवाराकडे अभियांत्रिकीची पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी असावी. सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ : उमेदवाराने 55 टक्के गुणांसह B.com किंवा CA/ICWA किंवा MBA ची पदवी मिळवलेली असावी. उर्वरित पदे : इतर उर्वरित पदांसाठी उमेदवार पदवीधर किंवा समतुल्य असावा. परीक्षा कधी असणार ? या रिक्त ३०३ जागांसाठीच्या परीक्षा या पुढील वर्षी २०, २१ आणि २२ जानेवारी २०२४ मध्ये होतील.