इचलकरंजी जेथे चार जानेवारीपासून रोटरी ट्रेड फेअर चे आयोजन. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने चार ते आठ जानेवारी 2024 च्या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक केए टीपी ग्राउंडवर रोटरी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुते, रोटरी ट्रेड फेअर चेअरमन महादेव खारगे यांनी पत्रकार बैठकीत दिली. या वर्षाचे रोटरी ट्रेड फेअर चे 23 वे वर्ष आहे. इचलकरंजी एकमेव पसंतीचा व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लागणारे हे प्रदर्शन याही वर्षी दिमाखात साकारणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार बैठकीत क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुते यांनी दिली.