Logo
ताज्या बातम्या

विविध मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टर आक्रमक; 7 फेब्रुवारीपासून सामूहिक रजा किंवा संपावर जाण्याचा इशारा

राज्यातील निवासी डॉक्टर (Doctors) 7 फेब्रुवारीपासून संपावर जाणार आहेत. डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था, बहुतांश रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची चांगली सोय नसणं, अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारची सर्व वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी 7 फेब्रुवारीपासून सामूहिक रजा किंवा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अभिजीत हेलगे यांनी निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना कळवले आहे. तसेच, डॉक्टरांच्या सर्व मागण्यांबाबतच पत्रकही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना देण्यात आलं आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था, बहुतांश रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची चांगली सोय नसणे, अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी 7 फेब्रुवारीपासून सामूहिक रजा किंवा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. निवासी डॉक्टरांच्या मागण्या काय? डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची चांगली सोय नसणे नियमित मानधनाचा अभाव (याशिवाय इतर अनेक समस्या) निवासी डॉक्टरांचा गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अभिजीत हेलगे यांनी म्हटलं आहे की, आपण गेल्या अनेक दिवसांपासून निवासी डॉक्टरांच्या विविध मागणीसाठी सघर्ष करत आहोत. मात्र, याबाबत सरकारकडून फारशी सकारात्मक पावलं उचलण्यात आलेली नाहीत. निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था, बहुतांश सृणालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची सोय नसणे, नियमित मानधनाचा अभाव अशा अनेक अडचणी निवासी डॉक्टरांना सतावत आहेत, असंही अभिजीत हेलगे पुढे बोलताना म्हणाले आहेत.