घटस्फोटित पत्नीसह तिच्या पतीवर कटरने वार केल्याप्रकरणी अटक केलेल्या घटस्फोटित पतीला शनिवारी इचलकरंजी न्यायालयात हजर केले असता ३ दिवस पोलिस कोठडी सुनावली. प्रकाश अशोक बुचडे (वय ४५) असे त्याचे नाव आहे. हल्ल्यामध्ये स्नेहल राकेश लोखंडे (वय २८) व राकेश राजू लोखंडे (वय ३०) हे जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात घडली. घटनेनंतर हल्लेखोर हा स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर झाला होता. घटस्फोटानंतर मुलांचा सांभाळ करण्यावरून स्नेहल व प्रकाश यांच्यात वारंवार वाद होत होता.