Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : बालशिक्षण परिषदेचे 23 वे राज्यस्तरीय अधिवेशन

महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेचे शिक्षण आणि मूल्यविचार या विषयावर येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात 23 वे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. 19 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होणा-या अधिवेशनासाठी राज्यभरातून सुमारे 1 हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील, अशी माहिती महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डी. एम. कस्तुरे आणि इचलकरंजीच्या केंद्राध्यक्षा डॉ. सपना आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.