Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : शहरात स्वच्छतेकडे महापालिकेचे दुर्लक्ष

इचलकरंजी शहरात सार्वजनिक स्वच्छतेच्या कामाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे चिकुनगुनिया, मलेरिया यासारखे साथीचे आजार फैलावण्याचा मोठा धोका वाढला आहे. प्रत्येक प्रभागात गटारी स्वच्छता, कचरा उठाव नियमित होण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.