Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : वयोवृद्धांना निर्जनस्थळी नव्हे, निवारा केंद्रात सोडा ः रवी जावळे

घरातील वृद्धांना कंटाळून अनेकजण निर्जनस्थळी सोडत आहेत. त्याऐवजी त्यांना बेघर निवारा केंद्रात सोडावे, जेणेकरून त्यांची देखभाल होऊन त्यांना त्यांचे जीवन जगता येईल, असे आवाहन माणुसकी फाउंडेशनचे सदस्य रवी जावळे यांनी केले आहे. वृद्धांना निर्जनस्थळी सोडण्याचा प्रकार आढळून आल्यास संबंधित व्यक्तीच्या नातेवाइकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. हातकणंगले परिसरात महामार्गापासून दोन-तीन किलोमीटर निर्जन जागेत दोन दिवसांपासून एक व्यक्ती झोपून असल्याची माहिती दिली. माणुसकी फाउंडेशनच्या सदस्यांनी तातडीने धाव घेत त्या व्यक्तीचा शोध घेतला. तिची आरोग्याची स्थिती बिकट होती. त्यामुळे तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्या व्यक्तीला इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आठवडाभरात ही सहावी घटना आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याचे जावळे यांनी सांगितले.