दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब व गरजू नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी व्हिजन इचलकरंजीतर्फे आयोजित केलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमात नागरिकांनी तब्बल ९ टन कपडे जमा केले आहेत. दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांनी माणूसकीची भिंत उपक्रमास भेट दिली. त्यांनी व्हिजन इचलकरंजीच्या उपक्रमाची माहिती घेत कौतुक केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र माने, माजी उपनगराध्यक्ष रवि रजपूते, नागेश पाटील, रामसागर पोटे आदींसह मान्यवर उपस्थित होते.