इचलकरंजीतील संजय गांधी निराधार लाभार्थ्यांच्या खात्यात आठ कोटी रुपये जमा. संजय गांधी निराधार योजनेच्या तीस हजार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आठ कोटी रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढणार असून त्यावर त्यांची दिवाळी गोड करण्याचा दिलेला शब्द आपण पाळला असल्याची माहिती संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष एडवोकेट अनिल ढाळे यांनी दिली.संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान मिळवून देणार असा शब्द आपण लाभार्थ्यांना दिला होता. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या गतिमान सरकारने लाभार्थ्यांसाठीचे अनुदान देऊन त्यांचे दिवाळी आत्ताच साजरी केली आहे. यासाठी खासदार धैर्यशील माने ,आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हळवणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. इचलकरंजी ही कामगार नगरी असल्याने येथे सर्वात जास्त लाभार्थी आहेत. राज्यातील गतिमान सरकारने दिवाळीपूर्वी 31 मार्च 2023 च्या लाभार्थ्यांना एप्रिल ते सप्टेंबर व 13 फेब्रुवारी 2023 च्या लाभार्थ्यांना मार्च ते सप्टेंबर पर्यंतच्या फरकाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहे. अशी माहिती एडवोकेट अनिल ढाळे यांच्यासह समिती सदस्य कोंडीबा दवडते, सलीम मुजावर सुखदेव माळकरी,सौ.सरीता आवळे, महेश पाटील, जयप्रकाश भगत, महेश ठोके, तमन्ना कोटगी, संजय नागरे यांनी दिली.