टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचा ऑलराउंडर खेळाडू हार्दिक पंड्या जखमी असल्याने तो संपूर्ण वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णा याला स्थान दिले आहे.
टीम इंडियाचा पुढील सामना ५ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) होणार आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपची उपांत्य फेरी गाठली आहे. बांगलादेश विरुद्ध पुण्यात झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना पंड्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले होते. पण उपांत्य फेरीपर्यंत पंड्या तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा होती. मात्र आता पंड्याला वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.