Logo
क्रीडा

सचिनचा आणखी एक मोठा विक्रम मोडणार, विराट कोहली जगातील पहिला खेळाडू ठरणार!

भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आज वानखेडे मैदानावर आमनासामना होत आहे. भारतीय संघ सातव्या विजयासाठी उत्सुक असेल. या विजयासह टीम इंडिया सेमीफायनलचे तिकिट निश्चित करणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी यंदाच्या विश्वचषकात खोऱ्याने धावा काढल्या आहेत. विराट कोहलीने एक शतक आणि तीन अर्धशतकासह धावांचा पाऊस पाडलाय. या खेळीत विराट कोहलीने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आजही विराट कोहलीच्या निशाण्यावर मोठा विक्रम आहे. फक्त 34 धावा करताच विराट कोहली मोठा विक्रम करणार आहे. विराट कोहलीला सचिनचा विक्रम मोडण्याची मोठी संधी आहे. हा रेकॉर्ड, एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा एक हजार धावांचा टप्पा पार करण्याचा आहे. सध्या सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी सात सात वेळा हा कारनामा केलाय. पण आता विराट कोहली सचिनच्या पुढे जाईल. त्यासाठी त्याला फक्त 34 धावांची गरज आहे. वानखेडे स्टेडिअमवर विराट कोहली हा विक्रम मोडेल. श्रीलंकेविरोधात विराट कोहलीची कामगिरीही जबराट आहे. त्यामुळे आज सचिनचा हा मोठा विक्रम मोडू शकेल. विराट कोहलीने यंदा वनडे क्रिकेटमध्ये 966 धावांचा पाऊस पाडला आहे. एक हजार धावांचा पल्ला पार करण्यासाठी विराट कोहलीला फक्त 34 धावांची गरज आहे. सध्या विराट कोहलीचा फॉर्म पाहाता वानखेडेवर तो हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. विराट कोहलीने यंदा एक हजार धावांचा टप्पा पार केल्यास, तो आठव्यांदा वनडे सामन्यात वर्षात हजार धावांचा पल्ला पार करणारा पहिला फलंदाज होईल. याआधी सचिन तेंडुलकर याने सातवेळा हा पराक्रम केला आहे. विराट कोहलीने कधी कधी वर्षभरात एक हजार धावांचा पल्ला पार केला ? वर्ष 2011: 34 सामने 47.62 च्या सरासरीने 1381 धावा (4 शतक आणि 8 अर्धशतक) वर्ष 2012: 17 सामने 68.40 च्या सरासरीने 1026 धावा (5 शतक आणि 3 अर्धशतक) वर्ष 2013: 34 सामने 52.83 च्या सरासरीने 1268 धावा (4 शतक आणि 7 अर्धशतक) वर्ष 2014: 21 सामने 58.55 च्या सरासरीने 1054 धावा (4 शतक आणि 5 अर्धशतक) वर्ष 2017: 26 सामने 76.84 च्या सरासरीने 1460 धावा (6 शतक आणि 7 अर्धशतक) वर्ष 2018: 14 सामने 133.55 च्या सरासरीने 1202 धावा (6 शतक आणि 3 अर्धशतक) वर्ष 2019: 26 सामने 59.86 च्या सरासरीने 1377 धावा (5 शतक आणि 7 अर्धशतक) तीन वर्षानंतर विराट फॉर्मात - विराट कोहली 2020 पासून लयीत नव्हता.. त्याच्या बॅटमधून धावा तर येत होत्या, पण मोठी खेळी येत नव्हती. पण आता विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपायला सुरुवात झाली आहे. कोरोना काळात विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक आले नव्हते. पण 2023 मध्ये विराट कोहली भन्नाट फॉर्मात आहे. 2019 मध्ये अखेरच्या वनडेत वर्षभरात एक हजार धावांचा पल्ला पार केला होता. आता यंदा तो एक हजार धावांचा पल्ला पार करणार आहे.