Logo
राजकारण

श्रीरामपूर येथे महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा भव्य कामगार मेळावा उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेतर्फे श्रीरामपूर येथे भव्य कामगार मेळावा सतीश देसाई (प्रधान तंत्रज्ञ) यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्यात वीज विभागातील असंख्य कर्मचारी बांधवांनी संघटनेच्या नेतृत्वावर दृढ विश्वास व्यक्त करत जाहीर प्रवेश केला. मेळाव्याचे उद्घाटन संघटनेचे मार्गदर्शक, केंद्रीय मुख्य सल्लागार अरुणजी भालेराव व संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस जालिंदर पांढरे यांच्या हस्ते झाले. या वेळी संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी, परिमंडळ,पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी व विभागीय शाखा स्तरावरील पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते तसेच महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्रीरामपूर विभागीय शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. या मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी अतिशय मोलाचे दिशादर्शक मार्गदर्शन केले संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेत कर्मचाऱ्यांच्या हक्क व सन्मानासाठी सुरू असलेल्या लढ्याचा गौरव केला. नव्याने प्रवेश केलेल्या सभासदांचे स्वागत करत संघटनेत शेकडो सभासदांना जाहीर प्रवेश देण्यात आला, यावेळी सर्व वीज कर्मचाऱ्यांनि संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिकरीत्या वाचन केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित सभासदांनी “एकता, हक्क आणि सन्मानासाठी संघटित राहू” असा दृढ निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाचा शेवट हा राष्ट्रगीतांनी झाला.