Logo
राजकारण

'मविआ'त फूट पाडण्याचा दिल्लीत प्रयत्न; राऊतांचा भाजपवर निशाणा

निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या तारखा जाहीर झाल्या. यानंतर देशासह राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘मविआला मिळणारं यश बघून दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. आमच्या मतात फूट पाडण्यासाठी दिल्लीत प्रयत्न सुरू असल्याची टीका करत, राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे’. पुढे बोलताना राऊत म्हणाले, कुणाला भाजपला वैयक्तिक मदत करत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे मनसेच्या महायुतीत जाण्याने मविआला काहीही फरक पडत नाही. तसेच वंचितला सोबत घेण्यासाठी मात्र आमही शेवटपर्यंत प्रयत्न करू असेदेखील त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची काँग्रेसकडून महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे पाटोलेंनी संयमी भूमिका घ्यावी, अशी अपेक्षादेखील खासदार राऊत यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्या शक्तींना महाराष्ट्रातील जनता सडेतोड उत्तर देईल; असा टोलादेखील अमित शहा यांना खासदार संजय राऊत यांनी लगावला.