Logo
ताज्या बातम्या

फडणवीसांचे पीए असल्याचे सांगत १५ लाखांची फसवणूक; मुंबईत दोघे अटकेत

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे भासवून १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सुहास महाडिक आणि किरण पाटील अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मरीन ड्राइव्ह पोलिसांकडे आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.