अडचणीतील यंत्रमाग उद्योगासाठी 1 रू. आणि 75 पैशांची अतिरिक्त वीज सवलतीचा शासन निर्णय निर्गमीत करून इचलकरंजीवासियांना वार्षिक अतिरिक्त 102 कोटीची सवलत मिळवून दिल्याबद्दल आमदार प्रकाश आवाडे यांचा यंत्रमागधारकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, पॉवरलुम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, सुभाष बलवान, सोमाण्णा वाळकुंजे, दत्तात्रय टेके, किरण पोवार, राजू गिरी यंत्रमागधारक बंडोपंत लाड यांच्यासह कारखानदार उपस्थित होते.