Logo
ताज्या बातम्या

राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान खुले

राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान आजपासून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी अमृत उद्यानात उद्यान उत्सव २०२४ चे उद्घाटन केले. दरवर्षी देशभरातील ५ ते ६ लाख लोक अमृत उद्यानाला भेट देत असतात. वसंत ऋतूमध्ये हे उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले जाते. राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, यावर्षी सामान्य नागरिक २ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत अमृत उद्यानाला भेट देऊ शकतील. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तिकीट आरक्षित करता येतील. दरवर्षी देशभरातून लाखो लोक अमृत उद्यानाला भेट देण्यासाठी येत असतात. यंदा उद्यानात विशेष सेल्फी पॉईंट बनवण्यात आला आहे. १५ एकरांवर पसरलेल्या या प्रसिद्ध उद्यानात यावेळी ८५ हून अधिक प्रजातींची फुले आहेत. यात १०० हून अधिक प्रकारचे गुलाब आणि ५ हजार हंगामी फुलांच्या ७० विविध प्रजाती आहेत. विविध प्रजातींच्या फुलांव्यतिरिक्त १६० जातींची ५ हजार झाडे आहेत. अमृत उद्यानात येणाऱ्या नागरिकांसाठी प्रथमच १८ जातींचे ४२ हजार ट्यूलिप असलेली बाग विकसित करण्यात आली आहे. राष्ट्रपती उद्यानाव्यतिरिक्त भवनातील सामान्य अमृत लोक आठवड्यातील मंगळवार ते रविवार असे सहा दिवस राष्ट्रपती भवनाची मुख्य इमारत आणि राष्ट्रपती भवन संग्रहालयालाही भेट देऊ शकतात.