इचलकरंजी शहरास पाणी टंचाईची तीव्र समस्या भेडसावत आहे. यावर महापालिका प्रशासन उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे. असे असले तरी हे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे शहरातील बहुतांश कुपनलिका बंद असल्याने पाण्याची उपलब्धता करताना नागरिकांची मोठी कसरत होत आहे. मार्च महिन्यातच पाणी टंचाईची भीषण परिस्थिती असल्याने पुढील काही महिन्यात काय होणार, या भितीनेच नागरिक धास्तावले आहेत.