Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी येथे १०८ कुंडीय गणपती महायज्ञाचे सनातन ज्ञानपीठ प्रचार समितीच्या वतीने आयोजन, पत्रकार बैठकीत माहिती

सर्वांच्या कल्याणासाठी इचलकरंजीत प्रथमच श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती आणि श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाच्या वतीने भव्य 108 कुंडीय श्री गणपती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दोन ते दहा जानेवारी या कालावधीत नदी काठावरील श्री पंचगंगा वरद विनायक मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तर एक जानेवारीला महात्मा गांधी पुतळापासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी आणि श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समितीचे अध्यक्ष गोविंद बजाज यांनी केले आहे. इचलकरंजीतील पंचगंगा श्री वरद विनायक मंदिर परिसरात दहा दिवस चालणाऱ्या 108 कुंडली गणपती महायज्ञ कार्यक्रमासाठी विविध समित्या गठीत केल्या आहेत. त्या माध्यमातून नेटके नियोजन केले जात आहेत. भव्य मंडप उभारणीचे काम सुरू असून, कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आयोजक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी अशोक स्वामी यांनी इचलकरंजीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत आहे विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या या महायज्ञासाठी देशभरातून अनेक साधू उपस्थित राहणार आहेत. श्री श्री सीता रामदास महाराज. आज्ञाचार्य पंडित चिरंजीव शास्त्री, पंडित अक्षय अनंत गौड, संचित कैलास चंद्रजी जोशी यांचे मार्गदर्शन होणार आहे.