Logo
राजकारण

लोकसभेचा महासंग्राम; महाराष्ट्रात ५ टप्प्यात लोकसभा निवडणुका; ७ मे रोजी पहिला टप्पा

निवडणुक आयुक्तांनी लोकसभा निवडणुकांसदर्भात आज (दि.१६) महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या कालावधीत देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांसाठी ५ टप्प्यात मतदान होणार आहे. यामध्ये ७ मे ते १ जून पर्यंत हे पाट टप्पे पार पडणार आहेत. अंतिम म्हणजे पाचव्या टप्प्यातील मतदान ७, १३, २०, २५ आणि १ जून दरम्यान पाच टप्प्यात महाराष्ट्रात लोकसभा निवडणुक प्रक्रिया होणार असल्याचे निवडणुक आयोगाने आज (दि.१६) पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केले. यावेळी निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार, निवडणुक आयुक्त सुखबीरसिंह संधू आणि ज्ञानेश कुमार उपस्थित होते. १६ जूनला लोकसभेची कार्यकाळ संपत असून, जगातील सर्वात मोठी लोकशाहीमुळे भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. संपूर्ण निवडणुक यंत्रणा सज्ज आहे. ९७ कोटी नोंदणीकृत मतदार असून, १.५ कोटी अधिकारी आणि कर्मचारी लोकसभा निवडणुक प्रक्रिया राबवतील. १ कोटी ५२ लाख नवमतदार आहेत. यामधील ८५ लाख नवीन महिला मतदार असणार आहेत. भारतात दर हजार पुरूषांमागे ९४८ महिला मतदार आहेत. ४८ हजार तृतीयपंथी मतदान करणार आहेत. १२ राज्यांमध्ये पुरूषांपेक्षा महिलांचे मतदान अधिक आहे. ५५ लाख ईव्हीएम, ४ लाख वाहने या प्रक्रियेत असणार आहेत. त्यामुळे बोटाला शाई लावण्यासाठी सज्ज व्हा; असे आवाहन निवडणुक आयुक्तांनी परिषदेदरम्यान स्पष्ट केले. बिहार, गुजतरात, हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पं.बंगाल, तेलंगणा हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि तमिळनाडू २६ या राज्यातील विधानसभा पोटनिवडणुका पहिला टप्पा लोकसभेसोबत होणार आहे. लोकसभा निवडणूक ७ टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे आणि सातवा टप्पा 1 जूनला होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. निवडणुक प्रक्रियेत हिंसाचार खपवून घेतला जाणार भारतात वय वर्षे १०० वरील २ लाख मतदार असणार आहेत. ८५ वर्षांवरील ८२ लाख मतदार आहेत. त्यामुळे वयोवृद्ध ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना घरातूनच मतदान करता येणार आहे. निवडणुक आयोग स्वत: घरात जाऊन मतदान घेणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. तसेच निवडणुक प्रक्रियेदरम्यान हिंसा रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल रूम करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नसल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले. तसेच हिंसामुक्त निवडणूक प्रक्रियेसाठी विशेष पावले देखील उचलण्यात आल्याचे ते म्हणाले. पैशांचे गैरव्यवहार रोखण्यासाठी सोशल मीडियावरून खोट्या बातम्या, माहिती पसरवल्यास कठोर कारवाई आजच्या डिजिटल आणि सोशल युगात चुकीच्या माहितीचा सामना करणे अवघड आहे. चुकीची माहिती कळू नये यासाठी आम्ही काही उपाययोजना केल्या आहेत. आम्ही खोट्या बातम्या दूर करण्यासाठी सक्रिय आहोत. खोट्या बातम्या निर्माण करणाऱ्यांवर सध्याच्या कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. लक्षात ठेवा, “Verify Before You Amplify” हा खोट्या बातम्यांचा सामना करण्याचा मंत्र आहे. अचूक माहिती प्रचलित आहे याची खात्री करण्यासाठी अधिकृत स्त्रोतांवर अवलंबून राहू या. सतर्क राहा आणि निवडणूक प्रक्रियेची अखंडता राखण्यात आम्हाला मदत करा, असे आवहान देखील मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी केले. वैयक्तिक हल्ले, असभ्य भाषेपासून लांब राहा; राजकीय पक्षांना आवाहन निवडणुक प्रचारादरम्यान प्रवचनाचा मुद्दा निवडण्यासाठी निवडक आयोग पूर्ण तयारी करत आहे. पक्षांना वैयक्तिक हल्ले आणि असभ्य भाषेपासून परावृत्त करण्याचे आवाहन करा. प्रचारादरम्यान सभ्यता राखण्यासाठी परिभाषित भाषेचा वापर करा. आपल्या प्रतिस्पर्ध्यामध्ये सीमा ओलांडू नका, असे आवाहन देखील निवडणुक आयोगाकडून राजकीय ,पक्षांना करण्यात आले आहे.