Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : येथे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे संचलन

गुरुवार दिनांक 14 मार्च रोजी दुपारी एक वाजता इचलकरंजी शहरातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी इचलकरंजी पोलीस दलाच्या वतीने संचलन करण्यात आले. शिवतीर्थ परिसरातून सदर संचलनाला सुरुवात झाली. यामध्ये गाव भाग, शहापूर, शिवाजीनगर परिसरातील पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यामध्ये वाहनांच्या ताफ्यासह सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही पद्धतीचा वादविवाद अथवा कायदा व सुव्यवस्था भीडेल असे कोणतेही कार्य होऊ नये. यासाठी पोलीस दलाच्या वतीने हे संचलन करण्यात येत असल्याची माहिती पोलिस अधिकारी निकेश खाटमुंडे पाटील यांनी बोलताना दिली.