देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना छातीत इन्फेक्शन आणि तापामुळे पुण्यातील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रतिभा पाटील (यांना ८९) यांना बुधवारी रात्री येथील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहेत.
त्यांना ताप असून छातीत इन्फेक्शन झाले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, असे रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
प्रतिभा पाटील ह्या भारताचे राष्ट्रपतीपद भूषवलेल्या पहिल्या महिला आहेत. २००७ ते २०१२ दरम्यान त्या राष्ट्रपती पदावर होत्या.