इचलकरंजी शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळत नसल्याने हा प्रश्न आता गंभीर वळणावर पोहचला आहे. त्यात शासनाकडून मंजूर असलेल्या प्रस्तावित सुळकूड योजनेला दूधगंगा नदीकाठच्या गावांचा होत असलेला विरोध आणि योजना कार्यान्वित करण्यासाठी शासनाचे चालढकलचे धोरण हे इचलकरंजी शहरवासीयांमध्ये मोठा संताप निर्माण करणारे ठरत आहे. आता तर शासनाने समन्वय समिती स्थापन करुन वेळकाढू धोरण अंमलबल्याचा आरोप करत कृती समितीने लोकप्रतिनिधींना सोबत न घेता या योजनेच्या कार्यवाहीसाठी मोठा लोकलढा उभारण्याचा निर्धार केला आहे.