सर्वेक्षणास सहकार्याचे आवाहन इचलकरंजी मराठा समाज सर्वेक्षणास येणाऱ्या प्रगणकास आवश्यक माहिती देऊन शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील मराठा समाजाचे मागासलेपण तपासणी सर्वेक्षणासाठीची कार्यवाही इचलकरंजी शहरात सुरू होत आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त ४६८ प्रगणक, तसेच ३१ पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिले.