Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :पंचगंगेची पाणी पातळी खालावली

पंचगंगा नदीची पाणी पातळी खालावून नदीतील पाणी काळपट झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून इचलकरंजी शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. या दरम्यान योग्य प्रक्रिया करुन पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच या अनुषंगाने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन देखील महापालिका प्रशासनाने केले आहे.