Logo
ताज्या बातम्या

जय श्री राम..! मुकेश अंबानींचे 'अँटिलिया' प्राणप्रतिष्ठा साेहळ्यासाठी सजले

अयोध्‍येत रामलल्‍ला प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यास अवघ्‍या काही तासांचा अवधी राहिला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरात सर्वच स्‍तरांंमध्‍ये अभूतपूर्व असा उत्‍साह आहे. हा ऐतिहासिक क्षण दिवाळी सणासारखाच आनंदाने साजरा केला जाणार आहे. यामध्‍ये उद्योगजगतही आघाडीवर आहे. रामलल्‍ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी देशातील प्रख्‍यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्‍थान ‘अँटिलिया’ विशेष पद्धतीने सजवण्यात आले आहे. अयोध्‍येत सोमवार, २२ जानेवारी रोजी रामलल्‍ला प्राणप्रतिष्‍ठा सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत हा सोहळा पार पडणार आहे. रामलल्‍ला प्राणप्रतिष्ठा साेहळ्यापूर्वी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक मुकेश अंबानी यांचे निवासस्‍थान ‘अँटिलिया’ सजवण्यात आले आहे. प्राण प्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी मुकेश अंबानी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. राममय झाले ‘अँटिलिया’ रामलल्‍ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मुकेश अंबानी यांचे निवासस्‍थान ‘अँटिलिया’ विशेष पद्धतीने सजवण्यात आले आहे. ‘अँटिलिया’च्या सर्वात वरच्या मजल्‍यावर दिवे लावण्यात आले आहेत. त्‍यावर जय श्री राम लिहिले आहे. यासोबतच राम मंदिराचे चित्रही दिसत आहे. रामलल्‍ला प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यापूर्वी ‘अँटिलिया’ राममय झाल्‍याचे दिसत आहे. अयोध्‍यानगरी भोवती अभेद्य सुरक्षा कवच सोमवारी होणार्‍या प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी देशातील प्रख्‍यात उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी, बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्‍या क्रीडा क्षेत्रातील दिग्गज सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी या सेलिब्रिटींना ‘प्राण प्रतिष्ठा’मध्ये उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. अयोध्‍येत ‘एनडीआरएफ’ पथके, बॉम्ब-विरोधी आणि श्वान पथके आणि RPF जवानांसह सुमारे 13,000 सैन्य तैनात करण्यात आले आहे. बॉम्बविरोधी आणि श्वान पथके देखील तैनात करण्यात आली आहेत आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ने अयोध्येतील मंदिराजवळ एक छावणी उभारली आहे, असे वृत्त ‘एएनआय”ने दिले आहे. ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा दुपारी 12:20 वाजता सुरू होईल आणि दुपारी 1 वाजता संपेल. त्यानंतर पंतप्रधान मोदी 7,000 हून अधिक लोकांच्या मेळाव्याला संबोधित करतील. या सोहळ्यानिमित्त अनेक राज्यांनी सुट्टी जाहीर केली आहे तर केंद्राने अर्धा दिवस जाहीर केला आहे. प्राणप्रतिष्ठापूर्व विधी १६ जानेवारीपासून सुरू झाले आणि आज (दि.२१) त्‍याची सांगता होणार आहे. म्हैसूरस्थित अरुण योगीराज यांनी साकारलेली नव्याने बांधलेली ५१ इंची राम लल्लाची मूर्ती गुरुवारी (१८ जानेवारी) राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यात आली आणि शुक्रवारी तिची पहिली प्रतिमा प्रसिद्ध करण्यात आली होती. २२ जानेवारी रामलल्‍लाची प्राणप्रतिष्‍ठा झाल्‍यानंतर २३ जानेवारीपासून राम मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे.