Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगासाठी भरीव तरतूद नाही

राज्य सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी कोणतीच भरीव तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे खासदार, आमदार आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी वस्त्रोद्योगासाठी भरीव काम करण्याची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप राज्य विणकर सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मेटे यांनी व्यक्त केली आहे. तसेच वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी आता सर्व घटकांना सोबत घेऊन लढा उभारण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.