किरकोळ कारणावरून प्रोसेस कामगार परशुराम ऊर्फ प्रशांत भैरू कुराडे (वय २८, रा. इंदिरानगर) याचा खून रेकार्डवरील दोघा गुन्हेगारांसह तिघांनी दगडाने ठेचून केल्याचे सोमवारी निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी अजय ऊर्फ नवनाथ बापू काशिद (वय २४, रा. नमाजगे माळ), आदम ऊर्फ संभा महंमद मुजावर (२०, रा. नेहरूनगर) या दोघांना जयसिंगपूर येथून अटक केली आहे. तिसरा साथीदार साहिल चव्हाण याचा शोध घेण्यात येत आहे. जयसिंगपूर बसस्थानकातून इतरत्र पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आदम व अजय या दोघांना पकडले.