Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : वंचित बहुजन आघाडीची सभा

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या शुक्रवारी (दि. ८) रोजी इचलकरंजी येथे राजकीय न्याय हक्क निर्धार सभेचे आयोजन केल्याची माहीती जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे यांनी दिली. इचलकरंजी येथे दुपारी चार वाजता अण्णा भाऊ साठे मैदानावर ही सभा होत असल्याचे दयानंद कांबळे यांनी पत्रकात म्हटले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात कार्यकर्ते जोरदार तयारी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.