पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.६) कोलकाता येथे देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचे (Underwater Metro) उद्घाटन करणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी एका कार्यक्रमात ही अत्याधुनिक मेट्रो रेल्वे सेवा देशवासियांना समर्पित करतील.
कोलकाताची पाण्याखालील मेट्रो हुगळी नदीखाली बांधण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोलकाता मेट्रो रेल्वे सेवांचा आढावा घेतला होता. प्रवाशांसाठी पूर्णपणे तयार असलेली पाण्याखालील मेट्रो रेल्वे बुधवारी पंतप्रधान देशाला समर्पित करणार आहेत.
महाराष्ट्रालाही विकास प्रकल्पांची मिळणार भेट
पाण्याखालील मेट्रो व्यतिरिक्त पंतप्रधान कवी सुभाष-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेक्शन आणि तरातला-माजेरहाट मेट्रो सेक्शनचे उद्घाटन करतील. यासोबतच पंतप्रधान मोदी देशभरातील अनेक मोठ्या मेट्रो आणि रॅपिड ट्रान्झिट प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. पिंपरी चिंचवड मेट्रो-निगडी दरम्यान पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या विस्तारीकरणाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.