जागतिक महिला दिन आणि मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचे औचित्य साधून इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने हिरकणी
कक्षाचा शुभारंभ पायल माणगावे आणि ऐश्वर्या गंगावणे या महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सहा. आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखाधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, महिला बाल विकास अधिकारी सीमा धुमाळ आदी उपस्थित होते.