Logo
ताज्या बातम्या

रील्स बनवणाऱ्यांसाठीरील्स बनवणाऱ्यांसाठी खुशखबर! इन्स्टाग्रामने आणलं खास फीचर खुशखबर! इन्स्टाग्रामने आणलं खास फीचर

आजकाल केवळ तरुणाईच नव्हे, तर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच इन्स्टाग्रामवर रील्स बनवतात. या सर्व इन्स्टाग्राम क्रिएटर्ससाठी एक खुशखबर आहे. लवकरच इन्स्टा यूजर्स आपल्या रील्समध्ये गाण्यांचे लिरिक्स देखील अ‍ॅड करू शकणार आहेत.आतापर्यंत हा पर्याय केवळ इन्स्टा स्टोरीजना उपलब्ध होता. मात्र, आता रील्समध्ये देखील यूजर्स एखाद्या गाण्याचे बोल अ‍ॅड करू शकतील. यामुळे अवघड गाण्यांचे शब्द इतर यूजर्सना स्क्रीनवरच दिसू शकणार आहेत. रील्स एडिट करताना क्रिएटर्स हे लिरिक्स अ‍ॅड करू शकणार आहेत.इन्स्टाग्रामचे सीईओ अ‍ॅडम मोसेरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की लवकरच हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. येत्या काळात कंपनी रील्ससाठी आणखी काही खास फीचर्स लाँच करणार आहे, असंही मोसेरी यांनी यावेळी स्पष्ट केलं. एआय फ्रेंड मिळणार स्नॅपचॅट अ‍ॅपवर ज्याप्रमाणे एआय फ्रेंड उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे आता इन्स्टाग्रामवर देखील एक एआय चॅटबॉट उपलब्ध होऊ शकतो. याबाबत एका टिपस्टरने माहिती दिली आहे. कंपनीकडून मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.