रविवार 18 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता इचलकरंजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व माझी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या निधीतून कबनूर येथील इनाम स्मशानभूमीच्या अंतर्गत सुधारणा करणे या कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवडे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. यावेळी सरपंच शोभा पवार,माजी सरपंच मधुकर मनेरे, जवाहर बँकेत संचालक बबन केटकाळे, बी डी पाटील, जयकुमार काटाप्पा, अशोक पाटील, मनोहर मनेरे, निलेश पाटील, सुनील आडके, सुलोचना कट्टी, समीर जमादार, सैफ मुजावर, सुरेश केटकाळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ ही सदर कार्यक्रमास उपस्थित होते.