शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी एक वाजता इचलकरंजी स्टेशन रोडवरील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती झालेले अतिक्रमण तातडीने हटवावे या ठिकाणी सुशोभीकरण करावे, यासह अन्य मागण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना देण्यात आले. स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे.या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. परिणामी या ठिकाणचे अतिक्रमण काढून रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे आहे. यावर महापालिकेचे कोणतेही कारवाई केलेली नाही, त्यामुळे संघटनेच्या वतीने पुतळ्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या वतीने पंधरा दिवसात अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राम मादळी, जिल्हाध्यक्ष सुनील जावळे, तालुका अध्यक्ष अरुण कांबळे, माजी नगरसेवक नरेश नागरकर, विनायक जावळे आदींनी सहभाग घेतला होता.