Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : शेतकरी धोरणा विरोधात निदर्शने

केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणा विरोधात सर्व श्रमिक महासंघाच्या वतीने शुक्रवारी दुपारी १२ वाजता इचलकरंजी येथे प्रांत कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे. तरी या निदर्शनात सर्व शेतकरी, श्रमिक व कष्टकरी वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सर्व श्रमिक महासंघाचे कॉम्रेड सुनील बारवाडे यांनी केले आहे.