जागतिक बाजारपेठेत कापडाला अपेक्षित मागणी नसल्याने यंत्रमागावरील कापड उत्पादनात ३५ ते ४५ टक्के घट झाली आहे. परिणामी ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर वस्त्रोद्योगावर दिवाळखोरीचे मोठे सावट दाटून आले आहे. एकंदरीत, मंदीच्या वातावरणामुळे ' मँचेस्टर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील वस्त्रोद्योगावर मोठा विपरीत परिणाम जाणवू लागला असून त्यामुळे वस्त्रोद्योग व्यावसायिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होऊ लागली आहे.